राजकीय शत्रूत्वाने कल्याणमध्ये युतीधर्म संकटात? भाजप आमदाराची पत्नी ठाकरेंच्या उमेदवारासोबत?
कल्याणसाठी इच्छुक असलेली भाजप शिवसेना फुटीनंतर शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिंदेंविरूद्ध ठाकरेंची पणाला लागलेली प्रतिष्ठा आणि त्यात राजकीय शत्रुत्वामुळे भाजप आमदाराच्या पत्नीने ठाकरेंच्या उमेदवाराच्या प्रचारात लावलेली हजेरी या तिन्ही गोष्टींवरून दावे-प्रतिदावे सुरू झालेत.
ठाकरेंच्या प्रचारात भाजप आमदाराच्या पत्नीने हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. कल्याण लोकसभेत युती धर्म संकटात आल्याचे मोठे संकेत मिळालेत. भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी थेट ठाकरेंचे उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारात दिसल्या. एकीकडे कल्याणसाठी इच्छुक असलेली भाजप शिवसेना फुटीनंतर शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिंदेंविरूद्ध ठाकरेंची पणाला लागलेली प्रतिष्ठा आणि त्यात राजकीय शत्रुत्वामुळे भाजप आमदाराच्या पत्नीने ठाकरेंच्या उमेदवाराच्या प्रचारात लावलेली हजेरी या तिन्ही गोष्टींवरून दावे-प्रतिदावे सुरू झालेत. गणपत गायकवाड हे कल्याण पूर्व येथील भाजपचे आमदार आहेत. कल्याण पूर्व विधानसभेचा समावेश हा कल्याण लोकसभेत येतो. काही दिवसांपूर्वी गणपत गायकवाड आणि शिंदेंचे आमदार महेश गायकवाड यांच्यात वाद झाला होता. यावेळी एकनाथ शिंदेंमुळे आपल्याला गुंड बनण्याची वेळ आल्याचा आरोप गणपत गायकवाड यांनी केला होता. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट