जयंत पाटील हा डबक्यात पोहणारा मासा, कुणी केली जिव्हारी लागणारी टीका?
'अनेक वेळा अर्थमंत्री आणि जलसंपदा मंत्री असून देखील जयंत पाटलांनी निधी दिला नाही', सांगलीच्या जत तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवरून गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे.
जयंत पाटील हा डबक्यात पोहणारा मासा आहे, अशा शब्दात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार टीका केली आहे. सांगलीच्या जत तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवरून गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे. सांगलीच्या जत तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती हटवण्यासाठी अनेक वेळा अर्थमंत्री आणि जलसंपदा मंत्री असून देखील जयंत पाटलांनी निधी दिला नाही, असा गंभीर आरोप देखील आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. जत तालुक्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी आणि आढावा घेण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून जत तालुक्याचा दौरा करण्यात येत आहे. त्यावेळी गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
Published on: Jun 02, 2024 01:02 PM
Latest Videos