Gopichand Padalkar : STD च्या गुलामगिरीतून मुक्त व्हा, STD चा अर्थ सांगत गोपीचंद पडळकर यांनी कुणाला फटकारलं?

Gopichand Padalkar : STD च्या गुलामगिरीतून मुक्त व्हा, STD चा अर्थ सांगत गोपीचंद पडळकर यांनी कुणाला फटकारलं?

| Updated on: Oct 17, 2023 | 4:52 PM

VIDEO | भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवार यांच्यातील वाक् युद्ध काही केल्या थांबत नाही. अशातच पडळकरांनी पवार कुटुंबियांना पुन्हा डिवचलं आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा नाव न घेता पुन्हा शरद पवार यांच्यावर निशाणा, काय केली सडकून टीका?

बारामती, १७ ऑक्टोबर २०२३ | भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवार यांच्यातील वाक् युद्ध काही केल्या थांबत नाही. अशातच पडळकरांनी पवार कुटुंबियांना पुन्हा डिवचलं आहे. तुम्हाला का राग येत नाही? तुमच्या तळपायाची आग मस्तकात जात नाही? असा सवाल करत ते म्हणाले, किती दिवस तुम्ही STD च्या नादात गुरफटणार. STD म्हणजे साहेब, ताई आणि दादा. STD यांच्या गुलामगिरीतून बाहेर पडा, एकदिवस तुम्ही राजा व्हाल. साहेब, ताई आणि दादा म्हणायच सोडून द्या, असा सल्ला देत पडळकरांनी चांगलंच फटकारलं आहे. इंग्रजांच्या काळात गुलाम करण्यासाठी रचना केली होती, तशी या STD ची रचना आहे. आपला साहेब एकच डॉ. बाबासाहेब. बाबासाहेबांमुळे आपण आज माणसात आहोत, असं आमदार गोपीचंद पळकर म्हणाले. ते एका सभेमध्ये बोलत होते. “साहेब म्हणणं सोडून द्या, दबावात रहायचं सोडून द्या असेही पडळकरांनी म्हटलंय.

Published on: Oct 17, 2023 04:38 PM