Sangli | एसटी कर्मचारी तुपाशी व्हायचा असेल तर युनियन मुक्त कर्मचारी : गोपीचंद पडळकर
राज्याच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर हे आता सरसावले आहेत. आटपाडीच्या झरे येथे गोपीचंद पडळकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडलीय.
सांगली : राज्यातील एसटी कर्मचारी तुपाशी व्हायचा असेल तर “युनियन मुक्त कर्मचारी” गरजेचा असल्याचं भाजपचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं. ते आज सांगलीमध्ये बोलत होते. राज्याच्या अनेक एसटी कर्मचारी संघटनांकडून कोट्यावधी रुपये एसटी कर्मचाऱ्यांच्याकडून घेतले जातात. युनियनमधील पदाधिकाऱ्यांची मुलं परदेशी शिक्षण घेतात. तर एसटी कर्मचारी आणि त्याचे कुटुंब मात्र उपाशी आहे. त्यामुळे यापुढच्या काळात ‘युनियन मुक्त एसटी कर्मचारी’ हा आपला नारा असल्याचं पडळकरांनी स्पष्ट केलंय. सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी युनियनच्या सभासदत्वाचा राजीनामा देऊन एसटी कामगार युनियनची फलक फेकून देण्याचं आवाहनही पडळकर यांनी यावेळी केलंय. राज्याच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर हे आता सरसावले आहेत. आटपाडीच्या झरे येथे गोपीचंद पडळकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडलीय. या बैठकीत राज्यातील एसटी कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून सुरू असणारी लूट, एसटी कर्मचाऱ्यांच्या पगार आणि विविध मागण्यांच्या बाबतीत चर्चा झाली.