महाविकास आघाडीची नागपुरात वज्रमूठ सभा; भाजपचा कडाडून विरोध
नागपूरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होत आहे. याला भाजपने विरोध केलाय. पाहा व्हीडिओ...
नागपूर : नागपूरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होत आहे. याला भाजपने विरोध केलाय. खेळाच्या मैदानावर महाविकास आघाडीची सभा होत असल्याने या मैदानात सभा होऊ नये यासाठी माझा विरोध आजही कायम आहे. त्या भागातील नागरिकांसोबत राष्ट्रवादी आणि ठाकरे सेनेचे लोकही म्हणतात हे मैदान लहान आणि खेळाचं मैदान आहे त्यामुळे सभा नको, असं भाजप आमदार कृष्णा खोपडे म्हणाले आहे. गडकरी यांनी करोडो रुपये खर्चून हे मैदान विकसित केलं आहे. सातशे आठशे लोकांची कॅपॅसिटी असलेल्या या मैदानावर सभा घेण्यावर महाविकास आघाडी का आग्रही आहे जेव्हा की ही सभा लाखोच्या वर होणार असल्याचं सांगितलं जातं मग काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील स्थानिक नेते वरिष्ठांची दिशाभूल करत आहे का?, असंही खोपडे म्हणाले आहेत.