शिरूर लोकसभेसाठी भाजपकडून निवडणूक प्रमुखपदी 'या' आमदाराची वर्णी, चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

शिरूर लोकसभेसाठी भाजपकडून निवडणूक प्रमुखपदी ‘या’ आमदाराची वर्णी, चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

| Updated on: Jun 09, 2023 | 7:12 AM

VIDEO | भाजपची शिरूर लोकसभा मतदारसंघात मोर्चेबांधणी, शिरूर लोकसभेसाठी भाजपकडून निवडणूक प्रमुख जाहीर

पुणे : सध्या शिंदे गटात असलेले आणि शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील शिरूर मतदासंघातून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. मात्र महाविकास आघाडी असल्याने तसेच शिरुरच्या जागेवर विद्यमान खासदार राष्ट्रवादीचा असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिरूरची जागा अमोल कोल्हे यांना सोडणार असल्याची चर्चा होती. या चर्चेदरम्यान, शिरूर लोकसभेसाठी भाजपकडून निवडणूक प्रमुखपदी आमदार महेश लांडगे यांची भाजपने नियुक्ती केली आहे. यासंदर्भातील घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. भाजपने आपली शिरूर लोकसभा मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू केली असताना आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून महेश लांडगे यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. तर लोकसभा आणि विधानसभेसाठी भाजपकडून ४८ जागांवर लोकसभा निवडणूक प्रमुखाची घोषणा करण्यात आली आहे.

Published on: Jun 09, 2023 07:07 AM