‘त्यांचं वय झालंय, बुड्ढा सठिया गया’, एकनाथ खडसेंवर कोणाची जिव्हारी लागणारी टीका?

आपण राष्ट्रवादी सोडलीच नसल्याने भाजपाच अधिकृत प्रवेश झालाच नसल्याचा दावा करत एकनाथ खडसे यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. जळगावात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात खडसेंनी भाष्य केलं. मात्र तरी खडसेंच्या भूमिकेवरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

'त्यांचं वय झालंय, बुड्ढा सठिया गया', एकनाथ खडसेंवर कोणाची जिव्हारी लागणारी टीका?
| Updated on: Sep 23, 2024 | 5:48 PM

राज्याच्या राजकारणात एकनाथ खडसे यांच्या भाजप पक्षप्रवेशावरून चांगलीच चर्चा होत आहे. दरम्यान, एकनाथ खडसे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांवर खुद्द एकनाथ खडसे यांनी भाष्य करत पूर्णविराम दिला आहे. यावरून भाजप आमदारानेच त्यांच्यावर निशाणा साधला आहे. एकनाथ खडसे हे केवळ प्रसिद्धीसाठी खालच्या पातळीवरील आणि हीन दर्जाचे आरोप करत असतात, असं वक्तव्य करत भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी करत एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली. पुढे मंगेश चव्हाण असेही म्हणाले की, सध्या ते अनेक ठिकाणी हातपाय मारत आहेत. मात्र कुठेही त्यांना यश मिळालेलं नाही. जनता त्यांना नाकारत आहे. अपक्ष माणसाने त्यांचा पराभव केल्याचे पाहिला मिळालं आहे, असे म्हणत एकनाथ खडसेंवर जिव्हारी लागणारी टीकाही त्यांनी केली. तर एकनाथ खडसे यांचं वय झालं आहे. बुड्ढा सठिया गया, असे म्हणत खोचक टीकाही मंगेश चव्हाण यांनी खडसेंवर केली.

Follow us
'वय झालंय, बुड्ढा सठिया गया', खडसेंवर कोणाची जिव्हारी लागणारी टीका?
'वय झालंय, बुड्ढा सठिया गया', खडसेंवर कोणाची जिव्हारी लागणारी टीका?.
... तर राज्यातील जनतेला कुत्र्याचं मटण खावं लागेल; पडळकर काय म्हणाले?
... तर राज्यातील जनतेला कुत्र्याचं मटण खावं लागेल; पडळकर काय म्हणाले?.
राज ठाकरेंची शिंदेंसोबत बंद दाराआड 20 मिनिटं बैठक, कशावर झाली चर्चा?
राज ठाकरेंची शिंदेंसोबत बंद दाराआड 20 मिनिटं बैठक, कशावर झाली चर्चा?.
एकनाथ शिंदे यांच्याविरोधात मनसेचा बडा नेता लढणार? ठाण्यात मोठी खेळी
एकनाथ शिंदे यांच्याविरोधात मनसेचा बडा नेता लढणार? ठाण्यात मोठी खेळी.
माजी केंद्रीय मंत्र्यांच्या मुलांच्या डोक्यात..पवारांचा कोणावर निशाणा?
माजी केंद्रीय मंत्र्यांच्या मुलांच्या डोक्यात..पवारांचा कोणावर निशाणा?.
धारावीतील तणावाला जबाबदार कोण? आरोप करत सोमय्यांनी थेट नावंच सांगितली
धारावीतील तणावाला जबाबदार कोण? आरोप करत सोमय्यांनी थेट नावंच सांगितली.
'शरद पवारांनी कधी तरी हिंदूंचीही बाजू..', नितेश राणे नेमकं काय म्हणाले
'शरद पवारांनी कधी तरी हिंदूंचीही बाजू..', नितेश राणे नेमकं काय म्हणाले.
'जिहादी-तिरंग्याचा काय संबंध...', जलील यांच्यावर नितेश राणेंचा निशाणा
'जिहादी-तिरंग्याचा काय संबंध...', जलील यांच्यावर नितेश राणेंचा निशाणा.
'राजकारणात काहीही होऊ शकतं..', रविकांत तुपकरांनी काय केलं सूचक वक्तव्य
'राजकारणात काहीही होऊ शकतं..', रविकांत तुपकरांनी काय केलं सूचक वक्तव्य.
जलील यांची तिरंगा संविधान रॅली;रामगिरींसह राणेंबाबत केली ही मोठी मागणी
जलील यांची तिरंगा संविधान रॅली;रामगिरींसह राणेंबाबत केली ही मोठी मागणी.