पुण्यात लव्ह जिहादविरोधात मोर्चा, नितेश राणे यांनीही घेतला सहभाग
VIDEO | पुण्यातील पीडीत तरुणीच्या प्रकरणात जो गुन्हेगार आहे त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची केली मागणी
पुणे : पुण्यात आज लव्ह जिहादच्या विरोधात घोरपडी गावात मोर्चा काढण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्याची मागणी केली जात आहे. पुण्यातील घोरपडी गावात लव्ह जिहादच्या विरोधात काढण्यात आलेल्या मोर्च्यात भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी देखील सहभाग घेतल्याचे पाहायला मिळाले. तर पुण्यातील पीडीत तरुणीचा जो गुन्हेगार आहे त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली नितेश राणे यांनी यावेळी केली. पुण्यातील घोरपडी गावच्या बीटी कवडे रोड ते जयहिंथ चौकापर्यंत या मोर्च्याचा मार्ग होता. दरम्यान, पुण्यातील पीडीत तरुणी आणि कुटुंबासोबत नितेश राणे पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांचीही भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान, नितेश राणे त्यांना कारवाईसंदर्भात निवेदन देणार असल्याची माहिती मिळतेय.