Nitesh Rane यांच्या निशाण्यावर कोण? थेट दिला इशारा; म्हणाले, ‘देवेंद्र फडणवीस हे एकटेच काफी’
VIDEO | भाजप नेते नितेश राणे यांनी घेतलं टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाचं दर्शन, सगळ्यात जास्त बुद्धीची गरज कुणाला? नितेश राणे यांनी बुद्धीची देवता गणपती बाप्पाकडे काय मागितलं मागणं अन् काय दिलं खोचक उत्तर?
मुंबई, २२ सप्टेंबर २०२३ | ‘शंभर अजित पवार आलेत किंवा शंभर एकनाथ शिंदे जरी आलेत तरी ते मुंबई जिंकू शकत नाहीत’, अशी टीका उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज केल्याचे पाहायला मिळाले. संजय राऊत यांच्या या टीकेवर भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी एका वाक्यातच प्रत्युत्तर दिले आहे. मुंबई जिंकण्यासाठी एक देवेंद्र फडणवीसच काफी आहेत. त्यामुळे शंभर मोजण्यापेक्षा तुम्ही शंभर आदित्य ठाकरे आणा नाहीतर शंभर उद्धव ठाकरे आणा त्यासर्वांना एकटे देवेंद्र फडणवीस काफी आहेत. तेच तुम्हाला भारी पडेल, असे म्हणत नितेश राणे यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. तर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच भाजपा शिवसेना मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी टीव्ही ९ मराठीशी बोलताना व्यक्त केला.
Published on: Sep 22, 2023 04:47 PM
Latest Videos