‘नाच्या’वरून जुंपली, अंबानींच्या संगीत कार्यक्रमातील तेजस ठाकरेच्या डान्सवर भाजप आमदाराची जहरी टीका
अनंत आणि राधिकाच्या संगीत सेरेमनीमध्ये सारा अली खान, जान्हवी कपूर, मानुषी छिल्लर, शिखर पहाडिया, वीर पहाडिया या सर्व सेलिब्रिटींनी मिळून ‘बन्नो की सहेली..’ या गाण्यावर डान्स केल्याचे पाहायला मिळाले. या सेलिब्रिटींच्या डान्स ग्रुपमध्ये तेजस ठाकरे नाचताना दिसला. यावरून राजकीय वर्तुळातील भाजप आमदारानं बोचरी टीका केली आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याचा लग्नसोहळा हा एकच विषय सध्या सगळीकडे चर्चेत आहे. अनंत आणि राधिकाच्या संगीत सेरेमनीमध्ये सारा अली खान, जान्हवी कपूर, मानुषी छिल्लर, शिखर पहाडिया, वीर पहाडिया या सर्व सेलिब्रिटींनी मिळून ‘बन्नो की सहेली..’ या गाण्यावर डान्स केल्याचे पाहायला मिळाले. या सेलिब्रिटींच्या डान्स ग्रुपमध्ये तेजस ठाकरे नाचताना दिसला. यावरून राजकीय वर्तुळातील भाजप आमदारानं बोचरी टीका केली आहे. पवार यांचा नातू आदानींचा ड्रायव्हर होतो. ठाकरेंचा नातू अंबानीच्या लग्नात नाचतो. मग महाराष्ट्रासमोर येऊन मग गुजरात्यांना शिव्या घालायच्या. त्यापेक्षा आपल्या नातूला असं नाच्या आणि ड्राईव्हर करणं हे बंद केलं पाहिजे. याला आता नाच्या ठाकरे असं नाव द्यायला पाहिजे, अशी जहरी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली. तर नितेश राणे यांनी केलेल्या टीकेवर सुनील प्रभू यांनी उत्तर देत पलटवार केला आहे.