‘सिंधुदुर्ग तो बहाना है, पेंग्विन को सेलिब्रिटी के साथ नाचना है’; आदित्य ठाकरे यांच्यावर कुणाची बोचरी टीका
आदित्य ठाकरे हे उद्यापासून कोकण दौऱ्यावर आहे. आदित्य ठाकरे हे उद्यापासूनच खळा बैठका घेणार आहेत. आदित्य ठाकरे कोकणवासियांशी अंगणात बसून संवाद साधणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या याच दौऱ्यावरून भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी हल्लाबोल केला आहे. काय म्हणाले नितेश राणे बघा...
सिंधुदुर्ग, २२ नोव्हेंबर २०२३ : आदित्य ठाकरे हे उद्यापासून कोकण दौऱ्यावर आहे. आदित्य ठाकरे हे उद्यापासूनच खळा बैठका घेणार आहेत. आदित्य ठाकरे कोकणवासियांशी अंगणात बसून संवाद साधणार आहेत. यासह कोकण दौऱ्यावर असताना आदित्य ठाकरे पदाधिकाऱ्यांसोबत बैठका देखील घेणार आहेत. कोकणातील घराचं वैभव म्हणजे खळं. खळं म्हणजे मातीपासून बनवून शेणाने सारवलेला, घरासमोर अंगण म्हणून किंवा शेतीच्या कामांसाठी म्हणून तयार केलेला जमीनीचा भाग म्हणजे खळ. त्याच खळ्यात बसून आदित्य ठाकरे हे लोकांशी संवाद साधतील. तर आदित्य ठाकरे यांच्या याच दौऱ्यावरून भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी हल्लाबोल केला आहे. सिंधुदुर्ग तो बहाना है, पेंग्विन को गोवा में बॉलिवूड के कलाकारों के साथ नाचना है…, असे म्हणत नितेश राणे यांनी बोचरी टीकाही केली आहे. तर गोवा फिल्म फेस्टिवल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळा बैठक ह्याच काय साम्य? असा सवालही नितेश राणे यांनी केला आहे.