आधी वादग्रस्त वक्तव्य अन् नंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर काय म्हणाले नितेश राणे?
भाजप आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सर्वधर्म समभाव मानायचं नाही, फक्त हिंदूंशी व्यवहार करा अशी शपथ घेण्याचे आवाहन नितेश राणे यांनी नवी मुंबईतील एका कार्यक्रमात केल्याचे पाहायला मिळाले. बघा व्हिडीओ
हिंदूंची बाजू घेणे म्हणजे दंगल भडकाविणे नाही. यापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदूंना पाठबळ दिले, असे वक्तव्य नितेश राणे यांनी म्हटले आहे तर आम्ही राष्ट्रप्रेमी मुस्लिमांविरोधात नाही असे म्हणत नितेश राणे यांनी विरोधकांच्या टीकेवर स्पष्टीकरण दिले आहे. सर्वधर्म समभाव मानायचं नाही, फक्त हिंदूंशी व्यवहार करा अशी शपथ घ्या, असं विधान नितेश राणे यांनी नवी मुंबईत केलं. दरम्यान त्यांच्या या विधानानंतर चागलंच राजकारण चांगलंच तापलं असून विरधकांकडून नितेश राणेंवर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. दरम्यान, नितेश राणेंच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची ही काही पहिली वेळ नाहीये. रामगिरी महाराजांवरुन सुरु झालेल्या वादानंतर नितेश राणेंनी मशिदीत घुसून मारण्याची भाषा केली होती. इतकंच नाहीतर सांगलीत देखील लव्ह जिहादच्या मुद्द्यावरुन नितेश राणेंनी पोलिसांसंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.