Nitesh Rane | महाराष्ट्र सरकारनं मुस्लिम मोर्चे थांबवले नाही तर हिंदूंचेही मोर्चे निघतील :नितेश राणे
मोर्चावेळी आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आली. यात अनेक चारचाकी वाहनं आणि दुकानांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारला इशारा दिलाय.
मुंबई : त्रिपुरातील कथित घटनेच्या निषेधार्थ राज्यातील अमरावती, नांदेड आणि मालेगावमध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत. या तिन्ही शहरात मुस्लिम समाजाकडून निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. मोर्चावेळी आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आली. यात अनेक चारचाकी वाहनं आणि दुकानांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारला इशारा दिलाय. मुस्लिम समाजाच्या मोर्चावेळी झालेल्या आंदोलनात झालेल्या दगडफेकीच्या घटनेवरुन नितेश राणे यांनी राज्य सरकारला इशारा दिलाय. ‘हे मोर्चे महाराष्ट्र सरकारनी थांबवले नाही तर हिंदूंचे पण मोर्चे निघतील. हे राज्य सरकारनं लक्षात घ्यावं’, असं ट्वीट नितेश राणे यांनी केलंय.
Latest Videos