सदाभाऊ खोत फडणवीसांचा कुत्रा तर संजय राऊत साप, दोघांच्या भांडणात भाजप नेत्याची उडी

सदाभाऊ खोत फडणवीसांचा कुत्रा तर संजय राऊत साप, दोघांच्या भांडणात भाजप नेत्याची उडी

| Updated on: Nov 07, 2024 | 3:53 PM

मला महाराष्ट्र बदलायचाय. मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचाय. कसला तुला चेहरा बदलायचाय? कसला चेहरा? तुला तुझ्या चेहऱ्यासारखा पाहिजे का?, असं वादग्रस्त विधान सदाभाऊ खोत यांनी काल केलं. यानंतर संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली. अशातच या दोघांच्या वादात भाजप नेत्यानं उडी घेतली.

जत विधानसभा मतदारसंघात गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारासाठी झालेल्या कालच्या सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांबाबत एकेरी भाषा वापरली. त्यांनी शरद पवारांच्या आजारपणावरून टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केले. यानंतर संजय राऊत यांनी सदाभाऊ खोत यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना त्यांनी सदाभाऊ खोत हा तर देवेंद्र फडणवीसांचा कुत्रा आहे, अशी जहरी टीका केली. ‘ तुम्ही पवार साहेबांच्या आजारपणावर अशा प्रकारचा वक्तव्य करून महाराष्ट्राची मान शरमेन खाली घातली आहे. या लायकीची माणसं देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात उभी केली आहेत’, असेही राऊत म्हणालेत. तर या दोघांच्या भांडणात नितेश राणेंनी उडी घेतली आहे. ‘संजय राऊत हा उद्धव ठाकरेंचा पाळीव कुत्रा आहे. शरद पवारांचाही संजय राऊत हा पाळीव कुत्रा आहे. टॉमी म्हणतात त्याला..’, असं म्हणत नितेश राणेंनी संजय राऊतांवर निशाणा साधला पुढे ते असेही म्हणाले, ‘एखादा पाळीव कुत्रा तरी निष्ठावान असतो. पण संजय राऊत तर साप आहे. सापाला दूध पाजलं की तो आपल्याच माणसालाही डसतो’, असं म्हणत नितेश राणेंनी टीकास्त्र डागलंय.

Published on: Nov 07, 2024 01:54 PM