जेलमध्ये बसून औरंगजेबाची पुस्तक वाचावी, संजय राऊतांवर कुणाचा हल्लाबोल?
औरंगजेबी वृत्ती गुजरात, दिल्लीतून महाराष्ट्रावर चाल करून येते, असं वक्तव्य करत ठाकरे गटाते नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर नाव न घेतला हल्लाबोल केला. यावर बोलताना भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केलाय.
मुंबई , 21 मार्च 2024 : औरंगजेबी वृत्ती गुजरात, दिल्लीतून महाराष्ट्रावर चाल करून येते, असं वक्तव्य करत ठाकरे गटाते नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर नाव न घेतला हल्लाबोल केला. काही काळासाठी कोण जेलच्या बाहेर आहे. त्यानंतर जेलमध्ये बसून औरंगजेबाची पुस्तक वाचावी, असा खोचक टोला संजय राऊत यांचे नाव न घेता नितेश राणे यांनी लगावला आहे. पुढे ते असेही म्हणाले की, संजय राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जितकी टीका करतील तेवढे ते खड्ड्यात जातील. राऊतांनी मोदींची औरंगजेबसोबत तुलना करुन देशभरातील नागरिकांचा अपमान केला आहे. त्यात सुधारणा केली नाहीतर मालकाची आणि मुलाची अशी माहिती महाराष्ट्रासमोर दिली जाईल, असा इशारा नितेश राणे यांनी संजय राऊत यांना दिला. दरम्यान, संजय राऊत यांनी भाजपसोबत युती करु नये, म्हणून त्यांना काँग्रेसने सुपारी दिली आहे. स्वार्थाचे दुसरे नाव म्हणजे उद्धव ठाकरे असल्याचा हल्लाबोलही नितेश राणे यांनी राऊतांवर केला.