ओपन डेक बसवर टीका करणारे रोहित शर्माच्या मागे फोटोसाठी पोट धरून पळत होते, भाजप नेत्याचा टोला
भारतीय संघ T20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यातील विजयानंतर मायदेशी परतल्यानंतर मुंबईत भारतीय संघातील खेळाडूंची व्हिक्ट्री परेड निघाली. ही विजयी मिरवणूक एका मोकळ्या बसमधून निघाली. ही बस गुजरातहून आणल्याने विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला. यावरून नितेश राणेंनी पलटवार केलाय
ओपन डेक बसवर टीका करणारे रोहित शर्माच्या मागे फोटोसाठी पळत होते, असं वक्तव्य करत भाजप आमदार नितेश राणे यांनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे. इतकंच नाहीतर नितेश राणे यांच्याकडून रोहित पवार यांचा डबल ढोलकी असाही उल्लेख करण्यात आला आहे. शेंबड्यासारखं पहिले बसच्या नावाने रडायचं आणि मग संध्याकाळी त्या रोहित शर्मासोबत फोटो काढण्यासाठी त्यांच्या मागे पळत बसायचं हा डबल ढोलकीपणा आहे, असं नितेश राणे म्हणाले. तर मंत्रिपदासाठी नितेश राणे हे देवेंद्र फडणवीस यांना नेहमीच खूश करण्याचा प्रयत्न करतात, असं प्रत्युत्तर नितेश राणे यांना रोहित पवार यांनी दिलं आहे. चार महिन्याचा तुम्ही विचार करा, पण पुढच्या पाच वर्षांसाठी सामान्य जनता तुम्हाला कधीच मंत्री होऊ देणार नाही, अशी खोचक टीकाही रोहित पवार यांनी केली.
Published on: Jul 05, 2024 03:18 PM
Latest Videos