देवेंद्र फडणवीस यांच्याच नावानं पोलिसांना दम, नितेश राणे यांच्या 'त्या' वक्तव्यानं नवा वाद

देवेंद्र फडणवीस यांच्याच नावानं पोलिसांना दम, नितेश राणे यांच्या ‘त्या’ वक्तव्यानं नवा वाद

| Updated on: Feb 20, 2024 | 10:32 AM

राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाने आमदार नितेश राणे त्यांच्याच नावाने पोलिसांना दम देताय. नितेश राणे यांनी अकोल्यात जे विधान केलं त्यामुळे विरोधक आक्रमक होत त्यांनी भाजपवर टीका केली.

मुंबई, २० फेब्रुवारी २०२४ : एकीकडे राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कुणीही कायदा व सुव्यवस्था हाती घेऊ नये असे आवाहन करतात. तर त्यांचेच आमदार नितेश राणे त्यांच्याच नावाने पोलिसांना दम देताय. नितेश राणे यांनी अकोल्यात जे विधान केलं त्यामुळे विरोधक आक्रमक होत त्यांनी भाजपवर टीका केली. सरकार शिंदे, अजित दादा आणि भाजपचं, तर पोलिस खातं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारित आहे. स्वतः नितेश राण हे भाजपचे आमदार आणि सत्ताधारी आहेत. तर ते पोलिसांनाच दम देताय. विशेष म्हणजे सरकारमधून एकही बडा नेता यावर बोलायला तयार नाहीये. हिंदू आक्रोश मोर्चा निमित्त अकोला येथे नितेश राणेंनी चिथावणीखोर विधानं करून पोलिसांना दम दिल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण झालाय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Feb 20, 2024 10:32 AM