‘आधी 10 लाख भरा तरच उपचार’, ..अन् गर्भवतीनं जीव गमावला, पुण्यातल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, नेमंक काय घडलं?
दहा लाख रुपये न भरल्याने डिलिव्हरीला नकार दिलाय आणि त्यामुळे गर्भवतीचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. पुण्यातल्या दिननाथ मंगेशकर रुग्णालयावर हा आरोप करण्यात आलेला आहे.
दहा लाख रुपये भरल्यावरच डिलिव्हरी करणार अशी मुजोरी पुण्यातल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने केली आहे आणि त्यात गर्भवती तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. विशेष म्हणजे तनिषा भिसेचे पती भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे पीए सुशांत भिसे आहेत. आमदाराच्या पीएच्या पत्नीचाच दहा लाख रुपये भरले नाही म्हणून मृत्यू झाला.
सात महिन्याच्या गर्भवती तनिषा भिसे यांना 28 मार्चला रक्तस्त्राव सुरू झाला. रक्तस्त्राव सुरू झाल्यानंतर कुटुंबियांनी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांना आणलं. आधी दहा लाख रुपये भरा तरच ॲडमिट करू असं रुग्णालयाने सांगितल्याचा आरोप आहे. तीन लाख रुपये भरण्याची तयारी दर्शवून देखील उपचाराला नाकार दिल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे. तिथे दोन ते तीन तास वाया गेले अखेर कुटुंबियांनी तनिषाला सूर्या हॉस्पिटलमध्ये आणलं. 30 मार्चला तनिषा भिसे यांनी दोन जुळ्या मुलींना जन्म दिला पण त्यांची तब्येत बिघडली. 30 मार्चला सूर्या हॉस्पिटलनं मणिपाल हॉस्पिटलमध्ये त्यांना पाठवलं आणि 31 तारखेला त्यांचा मृत्यू झाला. मृत पावलेली महिला तनिषा भिसे यांचे पती हे भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे पीए आहेत. अमित गोरखे यांनी देखील दिनानाथ हॉस्पिटलवर आरोप करत विधानसभेत मुद्दा उचलणार असल्याचं म्हटलं आहे. बघा स्पेशल रिपोर्ट…

त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय

'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी

'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात

'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले...
