‘स्वतःचा पक्ष अंधारात ढकलणाऱ्यांनी कुणाचा सुर्य ऊगवणार याची काळजी करू नये’, भाजप आमदाराचा हल्लाबोल
VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभेच्या भाषणावरून सामना या वृत्तपत्रातून करण्यात आलेल्या टीकेवर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे आणि उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही केली बोचरी टीका
मुंबई, १२ ऑगस्ट २०२३ | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभेच्या भाषणावरून सामना या वृत्तपत्रातून टीकास्त्र सोडण्यात आले. यावर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘संजय राऊत काय बोलतात काय लिहितात याकडे आम्ही लक्ष देत नाही, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची लया घालवली. संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलावं याची किव येते, ज्यांच्या नखांची यांना सर नाही, ज्यांनी स्वतःचा पक्ष अंधारात ढकलला त्यांनी कुणाचा सुर्य ऊगवणार याची काळजी करू नये’, असे म्हणत भाजप आमदार प्रसाद लाड यांनी संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली. तर लोकसभेत मोदी यांनी जे भाषण होतं त्यात चिडचिड, न्यूनगंड असल्याची टीका विरोधकांनी केली, यावर प्रसाद लाड यांनी भाष्य केले, ते म्हणाले, चिडचिड विरोधकांची झाली ते सभागृह सोडून गेले. ज्यांनी अविश्वास ठराव ज्यांनी आणला तेच लोकसभेच्या बाहेर गेलेत. देशाचे तुकडे करण्याचं काम गांधी घराण्याने केलं. त्या गांधी घराण्यावर दोन सव्वा दोन तास पंतप्रधान देशाची स्वातंत्र्यापूर्वीपासूनची स्थिती मांडली. त्यामुळे कुठल्या गांधीच्या पोटात दुखलं, कोणत्या गांधींनी लोकसभा सोडली त्यामध्ये संजय राऊतही होते, असे म्हणत संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.