भाजप आमदाराने काढली कॉंग्रेसची कुवत, म्हणाले 'आता बोलक्या पोपटाने...'

भाजप आमदाराने काढली कॉंग्रेसची कुवत, म्हणाले ‘आता बोलक्या पोपटाने…’

| Updated on: Nov 06, 2023 | 11:48 PM

आतापर्यंतच्या निकालात अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महाविकास आघाडीपेक्षा अधिक जागा मिळाल्या आहेत, याचा आम्हाला आनंद आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महायुतीवर विश्वास दाखवला आहे. महाविकास आघाडीला त्यांची जागा दाखवली आहे.

मुंबई | 6 नोव्हेंबर 2023 : राज्य झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात भाजप क्रमांक एकचा पक्ष बनला आहे. या निकालानंतर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जळजळीत टीका केलीय. सकाळच्या बोलक्या पोपटाने ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल सुट्टीवर गेलेल्या त्यांच्या पक्ष प्रमुखांना कळवावे असा टोला त्यांनी लगावला. ग्रामपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महायुतीवर विश्वास दाखवला आहे. महाविकास आघाडीला त्यांची जागा दाखवली आहे याकरिता महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानतो असेही ते म्हणाले. आतापर्यंतच्या निकालात अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महाविकास आघाडीपेक्षा अधिक जागा मिळाल्या आहेत, याचा आम्हाला आनंद आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांना सांगू इच्छितो, भारतीय जनता पार्टीच्या विजयाच्या आसपास जाण्याची कुवत काँग्रेसची तर सोडाच पण महाविकास आघाडीची पण बनलेली नाहीये अशी टीकाही त्यांनी केली.

Published on: Nov 06, 2023 11:48 PM