‘संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय’, भाजपच्या बड्या नेत्याचा खोचक टोला
दिल्लीतील महाशक्ती महाराष्ट्रात हा खेळ करतंय आणि हा भाजपातील अंतर्गत खेळ आहे”, असं म्हणत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. तर कोणी काही फसलं नाहीय. दिल्लीच्या सूचनेनुसार डोंबाऱ्याचा खेळ सुरू आहे. दिल्लीतून डमरू हलतोय, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंसह भाजपवर केली.
“ईडी, सीबीआय, दिल्लीतील गृहमंत्रालयाला घाबरून तीन वर्षांपूर्वी शिवसेना फोडून पळून गेले. त्यांना तीन वर्षांत असं कोणतं टॉनिक मिळालं की ते दिल्लीला डोळे दाखवून रुसवे फुगवे करून बसलेत. दिल्लीतील महाशक्ती महाराष्ट्रात हा खेळ करतंय आणि हा भाजपातील अंतर्गत खेळ आहे”, असं म्हणत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. तर कोणी काही फसलं नाहीय. दिल्लीच्या सूचनेनुसार डोंबाऱ्याचा खेळ सुरू आहे. दिल्लीतून डमरू हलतोय, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंसह भाजपवर केली. दरम्यान, संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. ‘संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झाला आहे. त्यामुळे त्यावर बोलणं काही योग्य नाही.’ तर मुंबई पालिका निवडणूक होईपर्यंत भाजप एकनाथ शिंदे यांना गोंजारेल आणि निवडणुकीतील हेतू साध्य झाल्यानंतर भाजप जे करायचं ते करेल, असं मोठं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. यावरही त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “उद्धव ठाकरे यांचं आता उफाळलेलं प्रेम आधी उफाळले असते, तर एकनाथ शिंदे सोडून गेले नसते”, असा टोला भाजपचे नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी लगावला. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.