Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prashant Bamb On Audi Clip | शिवीगाळ करून खोटं राजकारण करून वातावरण बिघडवू नये :Prashant Bamb - tv9

Prashant Bamb On Audi Clip | शिवीगाळ करून खोटं राजकारण करून वातावरण बिघडवू नये :Prashant Bamb – tv9

| Updated on: Aug 26, 2022 | 12:26 PM

भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. यावेळी आमदार बंब म्हणाले, शिवीगाळ करून कोठे राजकारण करून वातावरण बिघडू नये. तर आमदार बंब यांनी मराठवाड्यातील शिक्षकांवर टीका करत असताना 70 टक्के शिक्षक हे त्यांच्या कार्यालयात उपस्थित नसतात असा आरोप केलेला आहे.

भाजप आमदार प्रशांत बंब यांची एक ऑडीओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली आहे. या कथीत क्लीपमध्ये जिल्हा परिषद शाळा शिक्षकच्या पत्नीने भाजप आमदार प्रशांत बंब यांना झापल्याचे समोर आले आहे. त्याच्या आधीही आमदार बंब यांच्यांवर जिल्हा परिषद शाळा शिक्षकाने त्यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. यावेळी आमदार बंब म्हणाले, शिवीगाळ करून कोठे राजकारण करून वातावरण बिघडू नये. तर आमदार बंब यांनी मराठवाड्यातील शिक्षकांवर टीका करत असताना 70 टक्के शिक्षक हे त्यांच्या कार्यालयात उपस्थित नसतात असा आरोप केलेला आहे. तर कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत कायदा आणि तसा नियम असून देखिल काही शिक्षक उपस्थित नसतात. तर आपण तेथेच राहत असल्याचे खोटे कागदपत्रं बनवून ते शासनाकडून पैसे घेतात. हे मी उघड केल्याने, तसं जाहीर बोलल्यानेच माझ्यावर खोटे आरोप आणि फोनवरून अशा धमक्या दिल्या जात आहेत.

Published on: Aug 26, 2022 12:26 PM