नाशिक लोकसभेवर दावा करत श्रीकांत शिंदेंच्या ‘त्या’ घोषणेची भाजपनं काढली हवा
नाशिकच्या मेळाव्यात श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा लोकसभेसाठी केली. या घोषणेनंतर तात्काळ भाजपनं आक्षेप घेतला. श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपनं या घोषणेची हवाच काढून टाकली.
मुंबई, १४ मार्च २०२४ : नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीमध्ये चांगलंच घमासान सुरू झालंय. श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपनं या घोषणेची हवाच काढून टाकली. तर श्रीकांत शिंदे यांना कोणतीही ऑथोरिटी नाही, असे प्रवीण दरेकर म्हणाले. नाशिकच्या मेळाव्यात श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा लोकसभेसाठी केली. या घोषणेनंतर तात्काळ भाजपनं आक्षेप घेतला. हेमंत गोडसे हे शिंदे गटाच्या शिवसेनेचे नाशिक येथील खासदार आहेत. याच जागेवर भाजपचाही दावा आहे. जागावाटप जाहीर होण्यापूर्वीच मुख्यमंत्री शिंदे यांच्या मुलानं हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा केल्याने महायुतीमध्ये उघडपणे खटके उडाल्याचे पाहायले मिळाले. महायुतीत विद्यमान १३ खासदारांऐवढ्या जागा शिंदे यांच्या शिवसेनेला मिळतील की नाही यावरून शंका आहे. तर शिंदेंना या जागा न मिळाल्यास भाजप त्या जागा लढणार असल्याची माहिती आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट