Ram Kadam Video : ‘अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?’, भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
राज्यात सुरू असलेल्या राड्याला नितेश राणेंचं वक्तव्य मूळ आहे की अबू आझमी यांचं मूळ असा सवाल विरोधकांकडून करण्यात येत असताना राम कदमांनी यावर देखील भाष्य केले आहे.
‘अबू आझमीला मांडीवर बसवणारे आता राजीनामा मागणार, नैतिक अधिकार काय?’ असा सवाल करत अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो, अशी विचारणा भाजपचे आमदार राम कदमांनी केली. अबू आझमींनी ज्यावेळी वादग्रस्त वक्तव्य केलं तेव्हा त्यांना समर्थन केलं. हे सगळं ठरवून चाललंय आणि फडणवीस सरकारला बदनाम केलं जातंय. त्यासाठी सध्या विरोधकांकडून षडयंत्र सुरू असल्याचा आरोप राम कदमांनी आज माध्यमांशी बोलताना केलाय. मात्र विरोधकांच्या षडयंत्राला कोणीही बळी पडणार नाही. राज्यात नुकताच अर्थसंकल्प सादर झाला. राज्यातील लाडक्या बहिणींना पैसे मिळताय हे विरोधकांना बघवत नाहीये, त्यामुळे राज्यात हिंसाचार सुरू आहे, असं राम कदमांनी म्हटलंय. नागपूर हिंसाचार प्रकरणात जर पोलिसांकडून दिरंगाई झाली असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन देताना राम कदमांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ‘ज्या उद्धव ठाकरेंनी अबू आझमीला स्वतःच्या मांडीवर बसवलं. त्यावरून राज्यात असे राडे सुरू आहे. राज्यात घडत असलेल्या घटनांचा घटनाक्रम पाहिला तर त्याला अबू आझमी कारणीभूत आहे’, असं स्पष्टपणे राम कदमांनी म्हटले.