हिंदुत्वावरून राम कदम यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल, काय म्हणाले बघा व्हिडीओ

हिंदुत्वावरून राम कदम यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल, काय म्हणाले बघा व्हिडीओ

| Updated on: Feb 14, 2023 | 6:36 PM

VIDEO | उद्धव ठाकरे यांना वारंवार का सांगावं लागत की हिंदुत्व सोडलं नाही? राम कदम यांचा सवाल

मुंबई : उद्धव ठाकरे यांची राजकीय आवश्यकता पहा त्यांना वारंवार हे सांगावं लागतंय की, त्यांनी हिंदुत्व सोडलं नाही. स्वाभाविक आहे, जर हिंदुत्व सोडलं नसेल तर वारंवार सांगायची गरज का? असा सवाल भाजप आमदार राम कदम यांनी उपस्थित केला आहे. ज्या दिवशी शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या नादाला लागले तेव्हाच त्यांचं हिंदुत्व संपल, महाराष्ट्राच्या जनतेला काहीच समजत नाही असं समजून त्यांची दिशाभूल करणं योग्य नसल्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. तर सत्तेच्या कालखंडात सरकार म्हणून तुम्ही आमदार आणि मंत्र्यांनादेखील भेटले नाही ही वस्तुस्थिती आहे आणि महाराष्ट्र हे विसरला नाही. आजही जे उरले-सुरले आहेत, त्यांना सत्तेत असताना कधी भेटला होतात, सत्ता गेली तेव्हा कार्यकर्ता आठवले, सत्तेत असताना कोणत्या कार्यकर्त्यांचे भले केले आहे, याचा लेखा जोखा मांडणं आवश्यक असल्याचा सल्लाही राम कदम यांनी दिला.

Published on: Feb 14, 2023 06:36 PM