... तर संजय राऊत राज्यसभेचे खासदार नसते, राम शिंदे यांचा निशाणा

… तर संजय राऊत राज्यसभेचे खासदार नसते, राम शिंदे यांचा निशाणा

| Updated on: Feb 05, 2023 | 8:30 AM

संजय राऊत यांच्या खासदारकीवर एकनाथ शिंदे यांची कृपा, काय म्हणाले राम शिंदे?

अहमदनगर : भाजपचे आमदार राम शिंदे यांनी ठाकरे गटाने नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी बोलत असताना राम शिंदे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, संजय राऊत बोलतात, बोलणं आणि कृती यामध्ये मोठी तफावत आहे, शेवटी केलेला प्लॅन हा यशस्वी झाला आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले आहेत, त्यामुळे विश्वास याच्यावरती विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही. कारण त्यांच्यासंदर्भात अधिक विश्वास ठेवला असता आणि गैरविश्वास केला असता तर संजय राऊत राज्यसभेचे खासदार दिसले नसते. ही एकनाथ शिंदे यांची कृपा आहे, त्यामुळे संजय राऊत राज्यसभेचे खासदार आहेत, असे म्हणत त्यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Published on: Feb 05, 2023 08:20 AM