‘ज्यांची गरज त्यांना स्वच्छ करतो, आमच्याकडे निरमा पावडर आहे’, भाजप आमदाराच्या वक्तव्याने खळबळ
VIDEO | विधान परिषदेत भाजप आमदारानं केलेल्या वक्तव्यानंतर यू टर्न घेण्याचा प्रयत्न... बघा व्हिडीओ
मुंबई : विरोधकांकडून भाजपवर सतत टीका होताना भाजप भ्रष्टाचाराची वॉशिंग मशीन आहे. तिथे गेल्यावर नेत्यांचे सगळे डाग धुतले जातात, अशी टीका होताना दिसतेय. मात्र आता खुद्द भाजपच्या आमदाराने आमच्याकडे गुजरातहून निरमा पावडर येते, ज्यांना गरज आहे त्यांना आम्ही स्वच्छ करतो, असे वक्तव्य केल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजप आमदार आमदार रमेश पाटील यांनी विधानपरिषदेत हे वक्तव्य केले आहे. मात्र या वक्तव्यानंतर त्यांनी यू टर्न देखील घेण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले. ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचे चिरंजीव भूषण देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर विरोधकांकडून भाजपवर टीका केली जातेय. याच पक्षप्रवेशावर भाष्य करताना रमेश पाटील यांनी संबंधित वक्तव्य केलं. आमच्याकडे न्याय मिळतो म्हणून भूषण देसाई यांनी पक्षप्रवेश केला, असंही ते यावेळी म्हणाले.