Suresh Dhas : सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर गंभीर आरोप; म्हणाले, 'चुकीच्या पद्धतीने...'

Suresh Dhas : सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर गंभीर आरोप; म्हणाले, ‘चुकीच्या पद्धतीने…’

| Updated on: Jan 08, 2025 | 6:04 PM

सर्वपक्षीय नेत्यांकडून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. तर सातत्याने मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या आणि त्यांचा राजीनामा मागणाऱ्या सुरेश धसांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यानंतर पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. 

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राज्यातील राजकीय परिस्थिती चांगलीच तापली आहे. अशातच सर्वपक्षीय नेत्यांकडून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. तर सातत्याने मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या आणि त्यांचा राजीनामा मागणाऱ्या सुरेश धसांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यानंतर पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘पंकजा मुंडे यांनी ७४५ शिक्षकांची चुकीच्या पद्धतीने नियुक्ती केली आहे.’, भाजपचे आमदार सुरेश धस यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर असा गंभीर आरोप केला आहे. दरम्यान बीड जिल्ह्यातील अधिकारी मी आणलेले नाहीत, असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. इतकंच नाहीतर तेव्हाच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी ते अधिकारी आणले असल्याचेही पंकजा मुडे यांनी म्हटलं होतं. बीड प्रकरणावरून भाष्य करताना पंकजा मुंडे म्हणाल्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमधील परिस्थिती सुधारतील, असा विश्वासही पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला होता. दरम्यान, यावरून सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांच्यावर शिक्षकांची चुकीच्या पद्धतीने नियुक्ती केल्याचा आरोप केला आहे. बघा काय म्हणाले सुरेश धस?

Published on: Jan 08, 2025 06:04 PM