Suresh Dhas : सुरेश धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले ‘कल खेल में हम हो ना हो, गर्दिश में…’
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला महिना उलटला तरी अद्याप मुख्य आरोपीचा थांगपत्ता लागलेला नाही. अशातच सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणानंतर राज्यातील आणि राजकीय वर्तुळातील वातावरण चांगलंच तापलं आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला महिना उलटला तरी अद्याप मुख्य आरोपीचा थांगपत्ता लागलेला नाही. अशातच सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान, बीड सरपंच हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, यासाठी सातत्याने मागणी लावून धरणारे भाजप आमदार सुरेश धस देखील या मोर्च्यात सहभागी झाले होते. या मोर्च्यात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकऱणावर बोलत असताना सुरेश धसांचा वेगळा अंदाज पाहायला मिळाला. सुरेश धस यावेळी काहिसे भावनिक झाल्याचेही पाहायला मिळाले. तर पुन्हा एकदा सुरेश धसांनी आका म्हणत सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाच्या मास्टरमाईंडवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. आका आंबानींना मागे टाकतात की काय अशी मला शंका आहे. आकांकडे काम करणाऱ्या अनेकांच्या नावावर जमिनी आहेत. पुण्यातील मगरपट्ट्यात आकांनी एक अख्खा फ्लोअर विकत घेतला आहे. ज्याची किंमत मार्केटमध्ये 75 कोटी रुपये इतकी आहे, हा फ्लोअर आकाच्या चालकाच्या नावावर आहे, असा दावा सुरेश धस यांनी केला आहे.