Suresh Dhas : 250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे धनंजय मुंडेंवर निशाणा, आरोप काय?

Suresh Dhas : 250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे धनंजय मुंडेंवर निशाणा, आरोप काय?

| Updated on: Dec 22, 2024 | 11:41 AM

भाजप आमदार सुरेश धसांनी महाराष्ट्र बोगस पीक विम्याच्या परळी पॅटर्ननुसार, २५० कोटींचा आरोप केलाय. नाव न घेता त्यांनी माजी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधत धसांनी भाजपलाच चिमटे काढलेत.

सत्ताधारी भाजप आमदार सुरेश धस यांनीच आपल्या सत्तेतील मंत्र्यांवर गंभीर आरोप केलेत. पीक विम्याच्या नावाखाली राज्यात शेकडो कोटींचा घोटाळा झाला. बोगस लाभार्थ्यांनी दुसऱ्या तालुक्यात अर्ज करत पैसे लाटण्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय. त्यांनी नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख माजी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर असल्याचे पाहायला मिळाले. भाजप आमदार सुरेश धसांनी महाराष्ट्र बोगस पीक विम्याच्या परळी पॅटर्ननुसार, २५० कोटींचा आरोप केलाय. नाव न घेता त्यांनी माजी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधत धसांनी भाजपलाच चिमटे काढलेत. गेल्या वर्षापासून महाराष्ट्र सरकारने १ रूपयांत पीकविमा सुरू केला. यानुसार शेतकऱ्यांना फक्त १ रूपया भरून पीक संरक्षणाची तरतूद आहे. तर उर्वरित पैसे सरकार स्वतःच्या तिजोरीतून भरणार होतं. सुरेश धस यांनी केलेल्या आरोपांनुसार बीड जिल्ह्यात पीकविमा घोटाळ्यात परळी पॅटर्न राबवला गेला. जमीन मालकांऐवजी दुसऱ्याच लोकांनी पीकविमा मिळवला. तर इतर तालुक्यातील वीमा परळीतल्याच काही बोगस शेतकऱ्यांनी उचलल्याचाही आरोप आहे. एकट्या बीड जिल्ह्यात साडे सात हजार हेक्टरवर पीकविमा घोटाळा झालाय. फक्त सोनपेठ तालुक्यातच ३ हजार १९० हेक्टर इतका बोगस पीक विमा घोटाळा झालाय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट….

Published on: Dec 22, 2024 11:41 AM