Beed Murder Case : मुख्यमंत्र्यांनी किंवा अजितदादांनी बीडचं पालकमंत्रिपद स्वीकारावं, बीड जिल्ह्याच्या आमदाराची मागणी
'बीडचे पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचं पालकमंत्रिपद स्वीकारून पदभार स्वीकारावा. अजित पवार जरी झाले तरी माझी हरकत नाही. पण हे दोघे पालकमंत्री होतील असे मला वाटत नाही. कारण...'
देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद स्वीकारावं, असं स्पष्ट मत बीड जिल्ह्याचे आमदार सुरेश धस म्हणाले. ते म्हणाले, “बीडचे पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचं पालकमंत्रिपद स्वीकारून पदभार स्वीकारावा. अजित पवार जरी झाले तरी माझी हरकत नाही. पण हे दोघे पालकमंत्री होतील असे मला वाटत नाही. कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भाग आहे म्हणून बीडचं पालकत्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कोणत्याही भागात थेट होता येत नाही. पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपैकी कोणीही बीड जिल्ह्याचं पालकमंत्री झालं तरी आनंदच आहे, असेही सुरेश धस म्हणाले. तर “बीड जिल्ह्यात कायदा राहिला नाही. कायदा-सुव्यस्था आहे की नाही हा प्रश्न पडला आहे. बीड जिल्ह्यात गँग ऑफ वासेपूर सुरू आहे” असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केला. आरोपी लवकरच अटक होतील अशी अपेक्षा आहे. आरोपी विष्णू चाटे हा आकाच्या खालचा छोटे आका आहे. पोलिसांनी पकडलं असं वाटत नाही, ते स्वत: सरेंडर झाले आहेत. यातला आका लवकरात लवकर आत गेला पाहिजे, अशी मागणीही सुरेश धस यांनी केली.