Suresh Dhas Video : सुरेश धसांकडून पुन्हा ‘त्या’ मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, ‘राष्ट्रवादीच्या मुख्य मुन्नीला…’
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाला. एसआयटीने मकोका कोर्टात वाल्मिक कराडचा ताबा मिळावा यासाठी अर्ज केला होता. तो अर्ज मकोका कोर्टाने मान्य केला. यानंतर वाल्मिक कराड याची कोठडी मिळावी यासाठी एसआयटीने वाल्मिक कराडला आज कोर्टात हजर करण्यात आलं आहे. काल वाल्मिक कराडवर मकोका […]
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाला. एसआयटीने मकोका कोर्टात वाल्मिक कराडचा ताबा मिळावा यासाठी अर्ज केला होता. तो अर्ज मकोका कोर्टाने मान्य केला. यानंतर वाल्मिक कराड याची कोठडी मिळावी यासाठी एसआयटीने वाल्मिक कराडला आज कोर्टात हजर करण्यात आलं आहे. काल वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई केल्यानंतर कराड समर्थकांनी परळी बंदची हाक दिली. यावर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘परळीचा नवीन पॅटर्न आता महाराष्ट्राने घ्यावा का? कुठेही आरोपीला ताब्यात घेतले की शहर बंद करायचे असा हा पॅटर्न आहे. आरोपींसाठी शहरे बंद करण्याचा नवीन पॅटर्न परळीमधून सुरु झाला आहे. व्यापारी शहर बंद करुन स्वत:चे नुकसान करत आहे’, असं स्पष्ट मत सुरेश धसांनी व्यक्त केले तर यावेळी त्यांच्याकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख करण्यात आला. ‘वाल्मिक कराड याच्या आई संदर्भात मी काही बोलणार नाही. त्या माऊलीच्या विरोधात आपणास काहीच बोलायचे नाही. एखाद्या भगिनींच्या बाबतीत काही बोललो तर विषयाचा फोकस दुसरीकडे जातो. त्यापेक्षा माझी तुम्हाला विनंती आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना सांगा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य मुन्नीला बोलायला लावा.’, असं सुरेश धसांनी म्हटले.