सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धसांनी तात्काळ अजित पवारांची भेट घेतली. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सरकारवर दबाव वाढला आहे. या वाढत्या दबावादरम्यान दोन बैठकाही झाल्यात. धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची भेट घेतली.
मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांकडून दबाव टाकण्यात आलाय. मात्र अजित पवार यांच्याकडे आपण राजीनामा दिला नाही आणि सुरेश धस यांना योग्य वेळी उत्तर देणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे. अशातच सुरेश धसांनी तात्काळ अजित पवारांची भेट घेतली. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सरकारवर दबाव वाढला आहे. या वाढत्या दबावादरम्यान दोन बैठकाही झाल्यात. धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची भेट घेतली. त्यांच्यात एक तास चर्चा झाली. तर अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्याच्यात २० मिनिटं चर्चा झाली. त्यानंतर अजित पवार हे सागर बंगल्यावरून निघाले. मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरून नेमकं काय करायचं ? यावरून या भेटीत खलबतं झाल्याची सूत्रांची माहिती आहे. तर दुसरीकडे सुरेश धस यांनी अजित पवार यांची भेट घेतली. राष्ट्रवादीच्या कार्यालयात अजित पवारांसोबत १५ ते २० मिनिटं सुरेश धस यांची चर्चा झाली. मात्र भेटीनंतर सुरेश धस यांनी वेगळंच कारण सांगितले. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट