सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय झाली चर्चा?

सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय झाली चर्चा?

| Updated on: Jan 07, 2025 | 5:58 PM

बीडच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून अजित पवार यांच्या भेटीसाठी सुरेश धस दाखल झाले होते. सुरेश धस यांनी राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात अजित पवार यांची भेट घेतली.

भाजप आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. बीडच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून अजित पवार यांच्या भेटीसाठी सुरेश धस दाखल झाले होते. सुरेश धस यांनी राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात अजित पवार यांची भेट घेतली. साधारण दीड तास अजित पवार आणि सुरेश धस यांच्यात चर्चा झाली. बीडमध्ये झालेल्या सरपंच हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सुरेश धस यांनी सातत्याने लावून धरली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सुरेश धस यांनी अजित पवार यांची भेट आज अजित पवार गटाच्या पक्ष कार्यालयात घेतली. मराठवाड्यात ज्या काही पतसंस्था आहेत, त्यामध्ये गैर कारभार झाला आहे. या पतसंस्थाचे मालक नागरिकांचे पैसे घेऊन फरार झाल्याचे पाहायला मिळत होते. दुप्पट-तिप्पट रक्कम परत देण्याचं आमिष पतसंस्थांच्या मालकांनी दिलं होतं. यासंदर्भातील घोटाळ्याचे पुरावे देखील सुरेश धस यांच्याकडे असल्याची माहिती मिळत आहे. यासंदर्भातही अजित पवार यांनी कारवाई करावी अशी मागणी देखील सुरेश धस यांनी यावेळी केल्याची माहिती मिळत आहे.

Published on: Jan 07, 2025 05:51 PM