Suresh Dhas VIDEO : कराडच्या पत्नीकडे ‘ते’ व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ‘ मी लई…’
वाल्मिक कराडच्या पत्नीने काल पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजप आमदार सुरेश धस यांना मोठं आव्हान दिलं. आपल्या पतीचे प्रकरण उकरुन काढणाऱ्यांची देखील प्रकरण उकरुन काढू, असा थेट इशाराच त्यांनी दिला. यावर सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
वाल्मिक कराडच्या पत्नीने काल पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजप आमदार सुरेश धस यांना मोठं आव्हान दिलं. आपल्या पतीचे प्रकरण उकरुन काढणाऱ्यांची देखील प्रकरण उकरुन काढू, असा थेट इशाराच त्यांनी दिला. यावर सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आका जो आहे तो सोपा आका नाही. या आकाकडे 17 मोबाईल होते. तुम्ही आता नाविन्यपूर्ण योजना सांगितली की, तो अमेरिकेहून धमकी देत होता. अमेरिकेचे सीम वापरत असेल. आका काय काय नाही करु शकत, आकाचा बाका 50-50 लोकांना प्रत्येक महिन्याला काहीतरी ठराविक लोकांना रक्कम पाठवत होता”, सुरेश धस यांनी असा खळबळजनक दावा केला. सुरेश धस यांचे माझ्याकडे काही व्हिडीओ आहेत, असा गंभीर आरोप वाल्मिक कराडच्या पत्नीने केला होता. यावर सुरेश धस यांनी भाष्य केले आहे. सुरेश धस म्हणाले, “हे बघा मी त्या माऊलीबद्दल काय बोललो का? महिला आहे. ती माझी भगिनी आहे. माझ्या भगिनी केलेल्या आरोपांवर मी काही बोलणार नाही. कोणताही पुरुष असेल त्याने माझ्यावर आरोप करावेत. व्हिडीओ, हे आणि ते, अरे कुठेच काही सापडू शकत नाही. लई धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलेलो आहे. माझे काही व्हिडीओ सापडणार नाहीत”, असं स्पष्टच सुरेश धस यांनी म्हटलं. इतकंच नाहीतर त्यांनी थेट असंही म्हटलं की, “एखाद्या पुरुषाने आरोप केले तर त्याला उत्तर देईन. आका आला तरी त्याला उत्तर देईन.”