Suresh Dhas Video : ‘… हे आमचं टार्गेट’, बीड जिल्ह्यातील झुंडशाही अन् गुंडगिरीवर सुरेश धसांनी स्पष्टच सांगितलं…
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वारंवार सुरेश धस यांच्यावरही आरोप केलेत. यावर सुरेश धसांना सवाल केला असता त्यांनी थेट फटकारल्याचे पाहायला मिळाले.
‘मतदानाच्या दिवशीचा व्हिडीओ व्हायरल होतोय. राष्ट्रवादीचे लोकं कसे वागताय? उमेदवाराने मतदानाला एकटंच जायचं.. पोलिसांना गप्प केलं जातंय. मतदानाच्या दिवशी झालेली मारामारी आम्हाला चांगली भोवली आहे. सगळ्या मतदारसंघातील ५ ते १० हजार मतं कमी झाले आहेत. लोकांनी उलट लोकांना मतं दिली. तुतारी चिन्हाचं वाढलेलं मतदान आहे. त्याचा परिणाम भाजपलाही भोगावा लागला. या संदर्भातील पत्र पूर्वीच प्रशासनाला दिलं होतं. पूर्वीचे एसपी हे आका सांगतील असंच ऐकणारे होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांना काढून टाकले’, असं म्हणत सुरेश धस यांनी नाव न घेतला वाल्मिक कराडवर निशाणा साधलाय. तर पुढे धस असेही म्हणाले की, परळीमध्ये जंगलराजच होतं. आता लोकं निःश्वास सोडायला लागलेत. काही व्हिडीओ समोर आणायचे झाले तर शंभर गुन्हे दाखल होतील, असा इशाराही धसांनी दिला. तर बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला तीन महिने पूर्ण होतायतं तर अद्याप एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही, यावर बोलताना सुरेश धस म्हणाले, ‘संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याचं घर-दारं जप्त केलं आहे. तो लवकरच सापडेल, कुठेच जाणार नाही’, असा विश्वासही व्यक्त केला आहे. दरम्यान, दमानिया करत असलेल्या आरोपांवर बोलताना धसांनी त्यांना फटकारलं आहे. ‘बीड जिल्ह्यातील गुंडगिरी आणि झुंडशाही संपली पाहिजे हे आमचं टार्गेट आहे. त्यावरून मला बाजूला जायला लावू नका’, असं धस म्हणाले.