Suresh Dhas : पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती? सुरेश धसांचा गौप्यस्फोट
संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील आरोपींना फाशी व्हावी या मागणीसाठी आज पैठणमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी सुरेश धस यांनी देखील या मोर्च्याला हजेरी लावली आणि पुन्हा एकदा धनंजय मुंडेंसह वाल्मिक कराड यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या हत्येनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक या प्रकऱणावरून आमने-सामने येत असून आरोप-प्रत्यारोपांच्या ऐकमेकांवर फैऱ्या झाडताना दिसताय. अशातच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील आरोपींना फाशी व्हावी या मागणीसाठी आज पैठणमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी सुरेश धस यांनी देखील या मोर्च्याला हजेरी लावली आणि पुन्हा एकदा धनंजय मुंडेंसह वाल्मिक कराड यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘पुण्याच्या एफसीरोडवर आकाने सात दुकानं बुक केली आहेत, ज्या एका दुकानाची किंमत पाच कोटी रुपये आहे.’, असा गौप्यस्फोट सुरेश धसांनी केला. पुढे ते असेही म्हणाले, आकांनी भरपूर माल जमावला आहे, आका आंबानींना मागे टाकतात की काय अशी मला शंका आहे. पुण्यातील मगरपट्ट्यात आकांनी एक अख्खा फ्लोअर विकत घेतला आहे. ज्याची किंमत मार्केटमध्ये 75 कोटी रुपये इतकी आहे, हा फ्लोअर आकाच्या चालकाच्या नावावर असल्याचा दावाही सुऱेश धसांनी केला आहे.