म्हणून लाडक्या बहिणीचा जुगाड, सरकारच्या योजनेवरून भाजप आमदाराचं धक्कादायक विधान

म्हणून लाडक्या बहिणीचा जुगाड, सरकारच्या योजनेवरून भाजप आमदाराचं धक्कादायक विधान

| Updated on: Sep 25, 2024 | 10:32 AM

लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी भाजप आमदाराने केलेलं एक विधान चांगलंच वादात सापडलं आहे, भाजपला महिलांची मतं मिळावी यासाठी लाडकी बहीण योजनेचा जुगाड केल्याचं आमदार टेकचंद सावरकर यांनी म्हटलंय.

महिलांनी भाजपला मतं द्यावी म्हणून आम्ही लाडक्या बहिणीची जुगाड केला, असं वक्तव्य खुद्द भाजपच्या आमदारानं केलंय. कामठी विधानसभेचे भाजप आमदार टेकचंद सावरकर हे एका सभेदरम्यान बोलत होते. इतकी सगळी भानगड मतांसाठीच आहे. मंचावरचे सारे नेते खोटे बोलत असतील तरी मी बोलणार नाही, असं सांगून मी आपल्याच पक्षाला अडचणीत आणलं आहे. यापूर्वीही शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे म्हणाले होते, जे आम्हाला मतं देणार नाही त्यांची नावं डिसेंबरमध्ये काढून टाकू, आमदार रवी राणा यांनी देखील मत नाही दिली तर खात्यातून पैसे परत घेवून टाकणार तर अता महिलांनी फक्त भाजपला मतं द्यावीत म्हणून लाडकी बहीण योजनेचा जुगाड असल्याचे टेकचंद सावरकर म्हणाले आहेत. यावर विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार महायुतीला मतांचा दुष्काळ आहे, म्हणून लाडकी बहीण योजना मतांसाठीचा जुगाड आहे, असं ट्वीटद्वारे म्हटले आहे.

Published on: Sep 25, 2024 10:32 AM