'राहुल गांधींची जीभ छाटू नये तर जिभेला चटके...', शिंदेंच्या आमदारानंतर भाजप खासदाराची जीभ घसरली

‘राहुल गांधींची जीभ छाटू नये तर जिभेला चटके…’, शिंदेंच्या आमदारानंतर भाजप खासदाराची जीभ घसरली

| Updated on: Sep 18, 2024 | 12:56 PM

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार अन् प्रवक्ते संजय गायकवाड हे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर भाजपचे नेते आणि खासदार अनिल बोंडे यांचीही जीभ घसरली आहे.

“जो राहुल गांधीची जीभ छाटेल त्याला ११ लाखांचे बक्षीस देण्यात येणार”, असं धक्कादायक वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार अन् प्रवक्ते संजय गायकवाड यांनी केल होतं. यानंतर आता भाजप खासदारानं देखील वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटू नये तर त्याच्या जिभेला चटके द्यायला हवे, असं त्यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर संजय गायकवाड आणि अनिल बोंडे यांची जीभ घसरली आहे. ‘जीभ छाटण्याची भाषा योग्य नाही. परंतु, राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्य हे भयानक आहे. त्यामुळे असं विपरीत वक्तव्य कोणी करत असेल, परदेशात जाऊन भलतीच वक्तव्य कोणी करत असेल तर त्याची जीभ छाटू नये, त्याच्या जिभेला चटते घ्यायला हवेत’, असं वादग्रस्त वक्तव्य अनिल बोंडेंनी केलं तर कोणतीही वक्तव्य करणाऱ्या लोकांच्या जीभेला चटके देणं आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Published on: Sep 18, 2024 12:56 PM