'मी बंदुक घेऊन देईन, लोकांचा जीव गेला तरी चालेल पण...', शिंदे गटाच्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य अन् एकच खळबळ

‘मी बंदुक घेऊन देईन, लोकांचा जीव गेला तरी चालेल पण…’, शिंदे गटाच्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य अन् एकच खळबळ

| Updated on: Aug 25, 2024 | 5:26 PM

बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारा संदर्भात अमरावती येथे आज हिंदुत्ववादी संघटनांनी विराट हिंदू मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान, शिंदे गटाचे पदाधिकारी नानकराम नेभनानी यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. इतकंच नाहीतर अमरावतीत केलेले त्यांचे हे वक्तव्य चर्चेत आले आहे.

महिलांना बंदुक बाळगण्याची परवानगी द्या, महिलांना बंदुका मी घेऊन देईन, शिंदे गटाचे पदाधिकारी नानकराम नेभनानी यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ते अमरावतीत बोलत होते. इतकंच नाहीतर ते पुढे असेही म्हणाले, दोन चार लोकांचा जीव गेला तरी चालेल पण वाईट माणूस वाचायला नको… दरम्यान, नानकराम नेभनानी यांनी केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. अमरावतीत बोलत असताना नानकराम नेभनानी म्हणाले, ‘मी देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली की, महिलांना बंदुका वापरण्याची परवानगी द्यावी. विशेषतः अमरावतीत जर परवानगी दिली तर मी सर्व बहिणींना बंदुका घेऊन देईन. त्यांनी त्या बंदुका आत्मरक्षणासाठी ठेवावी. यामध्ये जर दोन चार चांगल्या लोकांचा जीव गेला तरी चालेल पण वाईट माणूस जगता कामा नये.’ तर शिंदे गटाचे पदाधिकारी नानकराम नेभनानी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजप खासदार अनिल बोंडे यांनी देखील तसचं वक्तव्य केले आहे. मला बंदुक द्या, मला बंदुकीची जास्त गरज असल्याचे अनिल बोंडे म्हणालेत.

Published on: Aug 25, 2024 05:26 PM