भाजप खासदारावर अज्ञातांनी भिरकावला दगड, खांद्याला झाली दुखापत

भाजप खासदारावर अज्ञातांनी भिरकावला दगड, खांद्याला झाली दुखापत

| Updated on: Nov 26, 2023 | 11:46 AM

भाजप खासदार अनिल बोंडे यांच्यावर काही अज्ञात लोकांनी दगड मारल्याची घटना समोर आली आहे. अनिल बोंडे यांच्यावर अज्ञातांनी दगड भिरकावल्याने त्यांना डाव्या खांद्याला दुखापत झाली आहे

मुंबई, २६ नोव्हेंबर २०२३ : भाजप खासदार अनिल बोंडे यांच्यावर काही अज्ञात लोकांनी दगड मारल्याची घटना समोर आली आहे. अनिल बोंडे यांच्यावर अज्ञातांनी दगड भिरकावल्याने त्यांना डाव्या खांद्याला दुखापत झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील तिवसा शहरात गेल्या तीन दिवसांपासून बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. तर काल या शर्यतीचा शेवटचा दिवस असल्याने त्या कार्यक्रमाला अनिल बोंडे भेट देण्यासाठी गेले होते. त्यावेळी मागच्या बाजूने चार ते पाच दगड भिरकण्यात आले त्यातील एक दगड बोंडे यांच्या खांद्याला लागला यानंतर त्यांना थोडीशी दुखापत झाली. या घडलेल्या घटनेनंतर अनिल बोंडे यांनी तिवसा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. यानंतर अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

Published on: Nov 26, 2023 11:46 AM