टिपू सुलतान, औरंगजेब यांचे उदातीकरण खपवून घेणार नाही; भाजप खासदारनं दिला इशारा
काही दिवसांच्या आधी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापुरमध्ये पुढील काही महिन्यात अघटीत होईल असा इशारा दिला होता. त्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेता असं म्हणत आम्ही चौकशी करतोय असं म्हटलं होतं. त्यानंतर आता भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी सोलापुरात बोलताना अप्रत्यक्षरित्या कोल्हापुरातील घटनेवरुन सतेज पाटील यांच्याकडे बोट केले आहे.
सोलापूर : कोल्हापुरात झालेल्या जातीय दंगलीनंतर आता आरोप प्रत्यारोप पहायला मिळत आहेत. काही दिवसांच्या आधी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापुरमध्ये पुढील काही महिन्यात अघटीत होईल असा इशारा दिला होता. त्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेता असं म्हणत आम्ही चौकशी करतोय असं म्हटलं होतं. त्यानंतर आता भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी सोलापुरात बोलताना अप्रत्यक्षरित्या कोल्हापुरातील घटनेवरुन सतेज पाटील यांच्याकडे बोट केले आहे. मडाडिक यांनी, काही समाजकंटकांनी आक्षेपार्ह असे स्टेटस ठेवले. औरंगजेब आणि टिपू सुलतानचे उदात्तीकरण करणारे स्टेटस होते. म्हणून हिंदू युवकांच्या, हिंदुत्ववादी संघटनांसह सर्व हिंदूंच्या भावना भडकल्या. त्यातूनच हे झालं. गर्दीला चेहरा नसतो. पण ज्यांनी याच्याआधी ज्यांनी वक्तव्य केलं त्या नेत्याची चौकशी झाली पाहिजे. राज्यात टिपू सुलतान औरंग्याचे स्टेटस ठेवून उदात्तीकरण केले जात आहे. हे खपवून घेणार नाही. राज्यात एकमेव दैवत हे छत्रपती शिवरायाच आहेत. त्यामुळं टिपू सुलतान औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे लोक यांना राज्यात राहण्याचा अधिकार नाही.