राहुल गांधींच्या बाबतीत सरकारचा नव्हे तर काँग्रेसचा दोष, कुणाची जहरी टीका
VIDEO | बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न उद्ध्वस्त करण्याचे काम उद्धव ठाकरे करत आहेत, भाजप खासदारानं गेली टीका
मुंबई : संसदरत्न पुरस्कार मिळाल्यानंतर भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांचे मुंबईत जंगी स्वागत करण्यात आले. उत्तर मुंबईतील भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांना सरकारने संसदरत्न पुरस्कार जाहीर केला आहे. पुरस्कार स्वीकारल्यानंतर खासदार गोपाळ शेट्टी मुंबईत पोहोचले असता विविध संस्थांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते म्हणाले, मतदारसंघाच्या बाहेरील लोकं ज्यावेळी असं स्वागत करतात तेव्हा खूप आनंद होतो. अशाप्रकारचा सन्मान आणि प्रेम दिल्याने अजून समाजासाठी काम करण्याची शक्ती मिळते. दरम्यान, काँग्रेसच्या सत्याग्रहावर गोपाळ शेट्टी यांनी भाष्य केले. नशिबात जे असते तेच मिळते, राहुल गांधींच्या बाबतीत सरकारचा दोष नाही, दोष काँग्रेस पक्षाचा आहे, असे म्हणत त्यांनी खोचक टोला लगावला. तर मालेगावमधील उद्धव ठाकरे यांच्या सभेबद्दल प्रतिक्रिया देताना गोपाळ शेट्टी म्हणाले, बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न उद्ध्वस्त करण्याचे काम उद्धवजी करत आहेत, भारत देशात हिंदुत्व वाढावे हे आपल्या सर्वांचे ध्येय होते, या देशात हिंदूंचा सन्मान झाला पाहिजे, यावर बाळासाहेब ठाकरे यांनी काम केले होते.