अब्दालीच्या 15 लाखांची फोजेसोबत 1 लाख मराठ्यांनी लढा दिला आणि इतिहास घडला- ज्योतिरादित्य सिंधिया
भाजप खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आज दिल्लीत बोलताना मराठ्यांच्या जाज्वल्य इतिहास सांगितला. महादजी सिंधिया यांच्या नेतृत्वाखाली 10 फेब्रुवारी 1771 रोजी मराठा सैन्याने दिल्लीवरची लढाई फत्ते केली होती आणि याच दिल्ली दिग्विजयाच्या 251 व्या स्मृतिदिनानिमित्त नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात दिल्ली विजयोत्सव या कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं होतं खासदार विनायक सहस्त्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री […]
भाजप खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आज दिल्लीत बोलताना मराठ्यांच्या जाज्वल्य इतिहास सांगितला. महादजी सिंधिया यांच्या नेतृत्वाखाली 10 फेब्रुवारी 1771 रोजी मराठा सैन्याने दिल्लीवरची लढाई फत्ते केली होती आणि याच दिल्ली दिग्विजयाच्या 251 व्या स्मृतिदिनानिमित्त नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात दिल्ली विजयोत्सव या कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं होतं खासदार विनायक सहस्त्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सिंधिया यांनी काबूल ते कंदहारपर्यनत सगळी घराणं महादजींच्या नावानं कापायचे, महादजी शिंदे हे केवळ नाव नाही तर इतिहासाचं स्मारक असल्याचं सांगत १५ लाखांची फौज घेऊन पंजाबपर्यंत नरसंहार करत अब्दाली पोहचला पण त्याला रोखले, असा हा हा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास ज्योतिरादित्य सिंधिया यांनी यानिमित्ताने सांगितला.