Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kangana Ranaut : '... त्यामुळे दैत्यांचं तेच झालं', 'मविआ'च्या दारूण पराभवावर कंगना राणौत यांचा घणाघात

Kangana Ranaut : ‘… त्यामुळे दैत्यांचं तेच झालं’, ‘मविआ’च्या दारूण पराभवावर कंगना राणौत यांचा घणाघात

| Updated on: Nov 24, 2024 | 3:25 PM

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुती आणि भाजपचा ऐतिहासिक विजय झाल्याचे पाहायला मिळाले. तर महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला. यावर कंगना राणौत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे, म्हणाल्या....

विधानसभा निवडणुकीचा नुकताच निकाल लागला. यामध्ये महायुतीने 235 जागा जिंकून जोरदार मुंसडी मारली. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुती आणि भाजपचा ऐतिहासिक विजय झाल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये एकट्या भाजपचे तब्बल 132 आमदार विजयी झाले आहे. महाराष्ट्रात झालेल्या महायुतीच्या या दमदार विजयानंतर अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात दैत्यांचा पराभव झाला असे म्हणत कंगना रणौत यांनी महाविकास आघाडीवर जोरदार घणाघात केला आहे. कंगना रणौत यांना उद्धव ठाकरे यांचा पराभव होणार अशी अपेक्षा होती का?, असा सवाल केला असता. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. कंगना रणौत म्हणाल्या, “मला खात्री होती. कारण इतिहास या गोष्टीचा साक्षीदार आहे. माझे बरेच रिल्स, व्हिडीओ सुद्धा व्हायरल होत आहेत की आपण दैत्य आणि देवता यांना कसं ओळखतो? जे महिलांचा अनादर करतात, ते त्याच श्रेणीतील असतात. ते दैत्यच असतात. जे महिलांचा आदर करतात, ते देवतासमान असतात.” तर पुढे कंगना राणौत असेही म्हणाल्या की, आज महिलांना 33 टक्के आरक्षण, शौचालय, धान्य, गॅस सिलेंडर देण्यात आले आहेत. त्यावरून समजतंय दैत्य आणि देव कोण आहे? त्यामुळे दैत्यांचं तेच झालं, ते नेहमीपासून होत आलंय. त्यांचा पराभव झालाय.”असं म्हणत कंगना राणौत यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर बोलताना जोरदार मविआवर हल्लाबोल केला.

Published on: Nov 24, 2024 03:25 PM