Narayan Rane : ‘संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता…’; नारायण राणेंचा घणाघात
बीड संतोष देशमुख हत्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला आहे. राऊतांच्या आरोपांनंतर भाजप खासदार नारायण राणेंनी पलटवार केला.
बीड संतोष देशमुख हत्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला आहे. राऊतांच्या आरोपांनंतर भाजप खासदार नारायण राणे यांना माध्यमांनी सवाल केला असता त्यांनी थेट हल्लाबोलच केलाय. ‘संजय राऊतची मानसिकता चांगली नाही. ते सध्या डिप्रेशनमध्ये आहेत. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे मी लक्ष देत नाही. तुम्हीही देऊ नका’, असं म्हणत नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केलाय. पुढे ते असेही म्हणाले, शिवसेनेची सत्ता असताना संजय राऊत कोणाकोणाला पोसत होता. कोणकोणत्या माफियांना संजय राऊत भेटत होता. कोणती तीर्थयात्रा केली म्हणून जेलचा पुरस्कार मिळाला होता. हे त्यांना आधी सांगावं. शिवसेनेत बोलायला माणूस नसल्यामुळे त्याला कामधंदा नसल्याने बोलायला लावतात”, असं म्हणत नारायण राणे यांनी संजय राऊतांवर सडकून टीका केली. शिवसेनेसोबत युती याबाबत नारायण राणेंना सवाल केला असता, ते म्हणाले, याबद्दल वरिष्ठ नेते निर्णय घेतील. तो निर्णय आम्हाला मान्य राहील. मी काही ज्योतिषी नाही. त्यामुळे आता काही सांगू शकत नाही, असं म्हणत राणेंनी यावर अधिक बोलणं टाळलं.