सूनेच्या पक्षात सासरे येणार की विरोधात लढणार? एकनाथ खडसे भाजपात आले तर…रक्षा खडसेंच्या वक्तव्यानं चर्चा
रक्षा खडसे यांचे सासरे एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत खडसे कुटुंबातील सासरे आणि सून आमने-सामने येणार का? अशा चर्चा रंगताना दिसताय. यावरच खासदार रक्षा खडसे म्हणाल्या...
जळगाव, २३ फेब्रुवारी २०२४ : रावेर मतदारसंघात आगामी लोकसभा निवडणुकीत परिस्थिती काहिशी वेगळी आहे. कारण रक्षा खडसे यांचे सासरे एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत खडसे कुटुंबातील सासरे आणि सून आमने-सामने येणार का? अशा चर्चा रंगताना दिसताय. यावरच खासदार रक्षा खडसे म्हणाल्या, भाजपने रावेर लोकसभेबाबत खासदार रक्षा खडसे यांना तिकीट द्यावं किंवा न द्यावं हा विषयचं नाही. रावेर लोकसभेतील जनतेचा आणि मतदारांचा एकच कल तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी करण्याचा आहे. याशिवाय माझाही काही हट्ट नाही की मलाच तिकीट दिलं पाहिजे. तर एकनाथ खडसे भाजपात येणार असल्याच्या चर्चांवर त्या म्हणाल्या, महाराष्ट्रात आणि इतर राज्यात इतर पक्षाचे नेते भाजपमध्ये येत आहेत. अशोक चव्हाण यांचा देखील भाजपात पक्षप्रवेश झालाय. नाथाभाऊ भाजपमध्ये आले तर आम्हाला आनंदच आहे. आधीही नाथाभाऊ हे भारतीय जनता पार्टीचे नेतेच होते. ते आल्याने आनंद होईल आणि कोणीही भाजपमध्ये आलं तर त्याचं स्वागतच केलं जाईल, असे त्यांनी सांगितले.