‘जत्रा आली म्हणून सराव करणाऱ्यांमधला मी पैलवान नाही’, संजयकाका पाटील यांचा कुणाला टोला?
VIDEO | निवडून येण्यासाठी कायम लोकांमध्ये राहावं लागतं, संजयकाका पाटील यांचा कुणावर निशाणा?
सांगली : जत्रा आली म्हणून सराव करणाऱ्यांमधला मी पैलवान नाही तर आमची तयारी कायम सुरुच असते. निवडून येण्यासाठी लोकांच्यामध्ये कायम राहावं लागतं. मागील लोकसभा निवडणुकीत मला ६ लाखावर मते मिळाली होती. आमदार गोपीचंद पडळकरांना तीन लाखाच्या घरात मते होती. आम्ही दोघे एकत्र असल्याने यंदा ९ लाखावर मताधिक्य जाईल, असा दावा भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी केला. तर कॉंग्रेसचे लोकससभेचे संभाव्य उमेदवार विशाल पाटील यांना संजय पाटील यांनी असे म्हणत टोला लगावला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत लढत ही तिरंगी झाली होती, ज्यामध्ये गोपीचंद पडळकर यांना 3 लाखांचा आसपास मते मिळाली होती. पण आता पडळकर भाजपा मध्ये आहेत. त्यामुळे त्याची बेरीज नक्की आपल्या मतांमध्ये होईल. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत विजय आपलाचं होईल असा विश्वासही संजयकाका पाटील यांनी व्यक्त केला आहे.