‘मविआ’ची वज्रमूठ म्हणजे समुद्राच्या निसटत्या रेती सारखी, कुणी केली खोचक टीका
VIDEO | ... तर जयंत पाटील दुसऱ्या पक्षात जाणार का?, भाजप खासदारांचा खोचक सवाल
सोलापूर : महाविकास आघाडी या तिन्ही पक्षाची असणारी वज्रमूठ म्हणजे समुद्राच्या मुठीत न येणाऱ्या निसटत्या रेती सारखी आहे. तर काँग्रेसच्या भवितव्य बाबत पृथ्वीराजबाबा चव्हाण यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी अगोदरच काँग्रेसचा निम्मा कार्यक्रम केला आहे. आता राहिलेला कार्यक्रम करतील, असे सांगत भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडी आणि पृथ्वीराज चव्हाण यांना चिमटे काढल्याचे पाहायला मिळाले. तर जयंत पाटील म्हणतात पवार साहेब नसतील तर आम्ही पक्षात राहणार नाही. यांचा अर्थ ते दुसऱ्या पक्षात जाणार का ? असा सवालही यावेळी सुजय विखे पाटील यांनी करत राष्ट्रवादी आणि जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला. खासदार सुजय विखे हे पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी आले होते. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी हा हल्लाबोल केला.
Published on: May 03, 2023 02:59 PM
Latest Videos