'कोण संजय राऊत? मी त्यांना ओळखत नाही', भाजप खासदार आक्रमक होत म्हणाले...

‘कोण संजय राऊत? मी त्यांना ओळखत नाही’, भाजप खासदार आक्रमक होत म्हणाले…

| Updated on: Mar 04, 2023 | 6:05 PM

VIDEO | ...म्हणून संजय राऊत यांच्याकडून राजघराण्यावर वारंवार टीका होतेय, भाजप खासदाराने आक्रमक होत नेमका काय केला हल्लाबोल?

सातारा : साताऱ्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पक्षाच्या पदाधिकारी मेळाव्यादरम्यान पुन्हा एकदा छत्रपती घराण्याविषयी वक्तव्य केल्यानंतर आज भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला. यावेळी बोलत असताना ते म्हणाले, विकृत स्वभावामुळे संजय राऊत यांच्याकडून राजघराण्यावर वारंवार टीका केली जात आहे, संजय राऊत यांची ही विकृती वाढत चालली आहे.. राजघराण्यावर बोलताना समजून वक्तव्य केलं पाहिजे, असा सल्लाही उदयनराजे भोसले यांनी संजय राऊत यांना दिला आहे. मी त्यांना ओळखत नाही आणि त्यांना महत्त्वही देत नाही, असा खोचक टोलाही उदयनराजे भोसले यांनी राऊत यांना लगावला आहे. सत्तेत राहण्यासाठी ही विकृत लोक हवं तशी बरंळ ओकतात. संजय राऊत यांनी केलेलं वक्तव्य म्हणजे राजकीय स्वार्थाचे विधान असल्याचे म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली आहे.

Published on: Mar 04, 2023 06:04 PM